देशाचे कणखर नेतृत्व मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या दूरगामी दृष्टिकोनातून भारत विकासपथावर वेगवान वाटचाल करीत आहे. लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपला महाराष्ट्र गतिमान पद्धतीने विकासाच्या दिशेने उत्तुंग झेप घेतोय. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे ध्येय ठेवून प्रगत, बलशाली, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टी संकल्पबद्ध आहे. इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेल्या आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या नेत्रदीपक प्रगतीसाठी भाजपा छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष मा. श्री. किशोरदादा शितोळे यांच्या अभ्यासू नेतृत्वातून शहराच्या सर्वांगीण विकासाचे शिखर गाठण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकासाच्या या वाटचालीत साथ हवी आहे शहरातील प्रत्येक सुजाण नागरिकाची.
भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगरचे हे व्यासपीठ तुमच्यासाठीच आहे. नागरिकहो, तुमच्या भागातील नागरी समस्या, अडचणी, महानगरपालिका, पाणीपुरवठा, स्वच्छताविषयक समस्या, विकासाचे प्रश्न, शहर विकासासाठी तुमचे मत, सूचना अवश्य मांडा. शहर विकासाचे उपक्रम, भाजपाचे शहरातील कार्यक्रम, विधायक उपक्रम, सांस्कृतिक उपक्रम, वॉर्डनिहाय विकास बैठक, चिंतन शिबिर, युवा शिबिर याविषयी जाणून घेण्यासाठी, आजच भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगरला सोशल मीडियावर फॉलो व लाईक व सबस्क्राईब करा. चला तर मग पुढाकार घेऊया, छत्रपती संभाजीनगरला प्रगतीच्या शिखरावर नेऊया ! भाजपा छत्रपती संभाजीनगरला खंबीर साथ देऊया !
मराठवाड्यातील जनतेच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून अखंड अविरत कार्यरत असलेले युवा नेतृत्व म्हणजे भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री. किशोरदादा शितोळे. आजवरच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी भारतीय जनता पक्षात विविध जबाबदाऱ्या अत्यंत कुशलतेने सांभाळल्या. शिक्षण, समाजकारण व अर्थकारण यासह जलसंवर्धन क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारतीय जनता पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी अत्यंत कुशलतेने सांभाळताना त्यांनी समाजाच्या तळागाळातील घटकांशी जिव्हाळ्याचे नाते जपले. मराठवाड्याचे विकासप्रश्न, शहरी समस्या, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थी युवकांच्या शैक्षणिक अडचणी सोडवून मराठवाड्याच्या राजकीय पटलावर स्वकार्यकर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवला आहे.
शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहचवण्याचे किशोरदादांचे कार्य अखंडितपणे सुरू आहे. शिक्षित युवकांना व्यवसाय मार्गदर्शन, विविध कर्ज योजनांचा लाभ, स्टार्टअप उभारणीसाठी प्रयत्न करून त्यांनी अनेक यशस्वी उद्योजक घडवले आहेत. श्री. किशोरदादा शितोळे यांच्या आजवरच्या धडाकेबाज कार्याची दखल घेऊनच भारतीय जनता पक्षाने त्यांच्याकडे आता भाजपा छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष पदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नेत्रदीपक वाटचालीसाठी लाडके नेते श्री. किशोरदादा शितोळे सदैव संकल्पबद्ध आहेत.
देवाभाऊंनी एका अनाथ बहिणीला दिलेले वचन खरे केले DevendraFadnavis | Ravindra Chavan | BJP
पक्षप्रवेश २१ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र प्रदेश कार्यालय - भाजपा परिवारात हार्दिक स्वागत!!!
३१ लाख ६४ हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात थेट २,२१५ कोटी रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे

