महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. याच विचारला अनुसरून भाजपा छत्रपती संभाजीनगरच्या वतीने शहरभर विविध ठिकाणी महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. मा. देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरात खरोखरच रक्तदान शिबिरांचा महायज्ञ पार पडला. या शिबिरांच्या यशस्वीतेसाठी भाजप छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष श्री. किशोरदादा शितोळे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री. भागवतजी कराड, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री श्री. अतुलजी सावे, विधान परिषदेचे आमदार श्री. संजयजी केणेकर, भाजप प्रदेश पदाधिकारी श्री. बसवराजजी मंगरुळे, मा. उपमहापौर श्री. बापू घडामोडे यांनी अतिशय परिश्रम घेऊन, रक्तदानाचा हा महायज्ञ यशस्वी केला. शहरातील भाजपा मंडळ अध्यक्षांनी केलेल्या उत्तम नियोजनातून या रक्तदानाच्या महायज्ञाद्वारे तब्बल १३३२ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. रक्तदानाच्या या विक्रमाची नोंद लवकरच “आशिया बुक्स ऑफ रेकॉर्ड” मध्ये होणार आहे. या भरीव यशात भाजपा छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रत्येक कार्यकर्त्याचा मोठा वाटा आहे.
मानवी रक्ताची किंमत खरोखरच अनमोल आहे. कल्पना करा… कधी कधी जीवनात असाही एक क्षण येतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी रक्ताची गरज भासते. याशिवाय अपघात, शस्त्रक्रिया, गंभीर आजार किंवा प्रसूतीदरम्यान देखील रक्ताची तातडीची गरज भासू शकते. अशावेळी, जर रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा साठा नसेल, तर काय होईल? हा विचारही अंगावर काटा आणतो. त्यामुळेच रक्तदान शिबिरांचे आयोजन समाजासाठी नेहमीच आवश्यक असते. रक्त ही केवळ एक गरज नसून, ती अनेक जीवनांना वाचवणारी एक जीवनरेखा आहे. समाजातील रक्ताची गरज ओळखूनच भाजपा छत्रपती संभाजीनगरतर्फे शहरभर महारक्तदान शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी एकत्र येऊन शिबिरात रक्तदान केले. यात युवक – युवतींचा मोठा पुढाकार दिसून आला.
महारक्तदान शिबीर, भाजपा छावणी मंडळ
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा छावणी मंडळातर्फे पडेगावच्या ईश्वर हॉस्पीटल येथे आयोजित महारक्तदान शिबिरास भाजपा शहर जिल्हाध्यक्ष श्री. किशोरदादा शितोळे यांनी स्वेच्छेने रक्तदान करून या समाजोपयोगी उपक्रमाचा प्रारंभ केला. शिबिरात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी भाजपा मंडळ अध्यक्ष श्री. निलेश धारकर, श्री. दिपक ढाकणे, श्री. भरत यादव, श्री. रवी रनमारे, श्री. शुभम मनगटे (सोशल मीडिया), श्री. दिगंबर पोळ (वैद्यकीय सेल), श्री. कैलास वाणी यांनी अथक परिश्रम घेतले.
महारक्तदान शिबीर, भाजपा बेगमपुरा मंडळ
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतनानिमित्त भाजपा बेगमपुरा मंडळाने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरास शेकडो नागरिक उपस्थित होते. शिबिराच्या उत्तम आयोजनासाठी भाजपा बेगमपुरा मंडळ अध्यक्ष श्री. अमोल झळके, श्री. रवी रनमारे, श्री. शिवाजीराव इंझे, श्री. अनिल भिंगारे, श्री. बबन सरोदे, श्री. ससे पाटील, सौ. प्राप्ती चव्हाण, सौ. अनिता खडके, डॉ. शाकेर रजा यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास परिसरातील मान्यवर नागरिक, युवक महिलांची उपस्थिती लाभली.
महारक्तदान शिबीर, भाजपा गुलमंडी मंडळ
भाजपा गुलमंडी मंडळातर्फे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवस सोहळ्यानिमित्त गुलमंडी मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरास विधान परिषद सदस्य आमदार श्री. संजयजी केणेकर यांनी भेट दिली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अध्यक्ष श्री. महेश मल्लेकर, श्री. राजेश मेहता, श्री. रामेश्वर भादवे, श्री. बबनराव नरवडे, श्री. संजय जोरले, श्री. रविंद्र रानमारे, श्री. मुकेश जाधव यांनी परिश्रम घेतले. शिबिरात युवक -युवतींचा मोठा सहभाग दिसून आला.
महारक्तदान शिबीर, भाजपा सातारा-देवळाई मंडळ
भाजपा सातारा- देवळाई मंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरासाठी मंडळ अध्यक्ष श्री. ऋषिकेश भालेराव यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले. यावेळी श्री. भाऊरावजी देशमुख, श्री. ज्ञानेश्वर बोरसे, श्री. प्रवीण कुलकर्णी, श्री. राहुल चाबुकस्वार, सौ. सविता कुलकर्णी यांच्यासह परिसरातील मान्यवरांनी भेट देऊन रक्तदात्यांची भेट घेतली.
कॅबिनेट मंत्री श्री. अतुलजी सावे यांच्या संपर्क कार्यालयातही महारक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेच्या या महान कार्यात योगदान दिले.
महारक्तदान शिबीर, भाजपा क्रांती चौक मंडळ
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त क्रांती चौक मंडळातर्फे महारक्तदान शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजपा मंडळ अध्यक्ष श्री. सचिन गुगळे यांच्या पुढाकारातून असंख्य भाजपा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. यावेळी भाजपा शहर सरचिटणीस श्री. जालिंदरभाऊ शेंडगे, श्री. अरविंद डोणगावकर, श्री. मनोज पांगारकर, श्री. किशोर मानकापे, श्री. प्रवीण मरकळ, श्री. अशोक तुपे यांच्यासह अनेक मान्यवर नागरिकांची उपस्थिती होती.
Share via:
Leave Your Comment