भारताचे कणखर नेतृत्व पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दूरगामी निर्णयांमुळे आपला देश विविध क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करीत आहे. जागतिक पटलावर भारत एक शक्तिशाली आणि समृद्ध राष्ट्र म्हणून गतीने पुढे जात आहे. स्वतःला प्रधान सेवक म्हणविणारे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या कणखर, खंबीर नेतृत्वात घडत आहे सध्याचा विकसित भारत, समृद्ध भारत, सामर्थ्यवान भारत !
सत्ताकाळाच्या अगदी प्रारंभापासून राष्ट्र प्रथम हा संकल्प घेऊन त्यांनी देशवासीयांच्या हितासाठी अहोरात्र कार्य केले. प्रत्येक भारतीयाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय नजरेसमोर ठेवून दमदार पाऊले उचलली. बलाढ्य आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या उद्दामपणाचा धीराने, संयमाने मुकाबला केला. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचे कार्य सर्वव्यापी आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीत, त्यांनी उचललेल्या प्रत्येक पावलात भारतीयांचे उज्ज्वल भविष्य सामावले आहे. त्यांच्याच कार्यकाळात आजघडीला १५० कोटी भारतवासी सुवर्णकाळ अनुभवत आहेत.
आजपर्यंतच्या कार्यकाळात पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी अर्थकारण, समाजकारण, राजकारण, उद्योग-व्यवसाय, राष्ट्रसंरक्षण, भारतीयांचे जनजीवन, धर्म जागरण, संस्कृती रक्षण अशा विविध पातळ्यांवर कठोर, कणखर निर्णय घेतले आणि प्रगत, विकसित, मजबूत भारताच्या प्रगतीचा एक नवा अध्याय लिहिला. देशातील १५० कोटी जनतेच्या चेहऱ्यावर आज जे समाधानाचे, स्वाभिमानाचे हास्य दिसते ते फक्त आणि फक्त श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे. जागतिक पातळीवर आज आपला भारत देश ताठ मानेने उभा आहे. जपानला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथी प्रबळ अर्थव्यवस्था बनली आहे. जे कुणालाही जमले नाही ते श्री. नरेंद्रजी मोदी यांनी करून दाखवले, जनसेवा, सुशासन व गरिबांचे कल्याण ही तत्वे अंगीकारून. त्यांच्या प्रत्येक कृतीने भारतीयांच्या जनमानसावर ठसा उमटवला आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयाने भारतीयांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केले आहे.
त्यातील काही धडाकेबाज निर्णय असे : 
1. ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद चिरडला
2. अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयाचा संयमाने मुकाबला
3. कलम ३७० हटवून काश्मिरी जनतेला दिलासा
4. भारतीय सैन्यदलाला बनवले स्वावलंबी, आत्मनिर्भर
5. सर्जिकल स्ट्राईकद्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
6. तीन तलाक कायदा रद्द करून माता-भगिनींना न्याय
7. डिजिटल इंडियाद्वारे नागरी सेवांचे आधुनिकीकरण
8. वन नेशन, वन रेशनद्वारे देशभरात गोरगरिबांना मोफत धान्य
9. छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून भारतीय नौदलाला नवीन ध्वजचिन्ह
9. मेक इन इंडिया पॉलिसीतून भारत बनला आत्मनिर्भर
10. महिलांसाठीची उज्ज्वला गॅस योजना
11. महागड्या उपचार खर्चातून दिलासा देणारी आयुष्मान भारत योजना
12. शेतकऱ्यांना सन्मान निधीचे नियमित वाटप
13. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेतून घडवले युवा उद्योजक
14. सेंट्रल व्हिस्टा : नव्या संसद भवनाचे निर्माणकार्य यशस्वी
15. वंदे भारत एक्सप्रेसद्वारे गतिमान, सुरक्षित प्रवास
16. देशभरात नवनवीन विस्तारित महामार्गांचे निर्माण
17. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, अवाढव्य पूल, लांबच लांब बोगदे
18. चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज
19. चांद्रयान मोहीम, मंगल यान मोहीम यशस्वी
20. स्टार्टअप इंडियाने युवा उद्योजकांना दिली प्रेरणा
21. यशस्वी प्रयागराज महाकुंभ सोहळा
22. अयोध्यानगरीत भव्य श्रीराम मंदिर निर्माण
23. काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे निर्माण
24. उज्जैन येथे महाकाल लोक निर्मिती
25. कामाख्या देवी मंदिराचा अत्याधुनिक विकास
26. श्री केदारनाथ धाम मंदिराचा विकास
27. श्री सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार
28. देशभरातील बौद्ध धार्मिक स्थळांचा विकास
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी देशाच्या विकासासाठी, विविध राज्यांच्या प्रगतीसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन, कार्याला दिशा दिली आहे. विविध राज्यांमध्ये विकास कामांचे उद्घाटन आणि भविष्यातील कार्याची पायाभरणी केली आहे. त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आपला देश प्रगतीचे नवनवीन टप्पे ओलांडत आहे.
Share via:


Leave Your Comment